Friday, April 19, 2024

Latest Posts

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांचा पोलीस ठाण्यात अन्नत्याग

उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांच्या सुपुत्र वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) आणि नागेश बडेकर (Nagesh Badekar) हे दोघंही अजून बेपत्ता आहेत. तसेच आता या गोळीबार प्रकरणी विकी गणात्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई सुरु आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी विविध पथक तैनात करण्यात आली आहेत.

उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश आहे तर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी गणपत गायकवाड यांना सध्या ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये अन्नत्याग केला आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या घटनेत सहभागी नसतानासुद्धा त्याचा तपास घेतला जात असल्यामुळे त्यांनी अन्नत्याग केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते दररोज सकाळी उठून योगा करतात. गणपत गायकवाड यांची बुधवारी तपासणी केल्यानंतर त्यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, विकी गणात्रा, नागेश बडेकर हे तीन जण फरार आहेत. व्यावसायिक आणि भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा: 

तरुणाईला भुरळ पाडणारं अवधूत गुप्ते यांच्या ‘दूर दूर’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

सोलापूर विद्यापीठाचा बोगस कारभार, ५० पैकी ९९ मार्क दिल्याने विद्यार्थ्यंमध्यें गोंधळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss