Saturday, July 27, 2024

Latest Posts

सोलापूर विद्यापीठाचा बोगस कारभार, ५० पैकी ९९ मार्क दिल्याने विद्यार्थ्यंमध्यें गोंधळ

मागील काही महिन्यांपासून विद्यापीठांच्या बोगस कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मागील काही महिन्यांपासून विद्यापीठांच्या बोगस कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार सोलापूर विद्यापीठामध्ये (Solapur University) घडला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये (Punyashlok Ahilya Devi Holkar) परीक्षेचा निकालाचा बोगस गोंधळ समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना ५० पैकी ९९ मार्क दिल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार बीएससी सेमिस्टर तीनच्या निकालामध्ये घडला आहे.

सोलापूर विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांच्या ५० गुणांच्या परीक्षा घेतल्या जातात. पण या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यंनाचा मार्कांमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. १३ डिसेंबर २०२३ रोजी बीएससी सेमिस्टर 3 च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल सगळ्यांना चकित करण्यासारखा लागला आहे. या परीक्षेमध्ये ४० गुणांचा लेखी पेपर आणि १० गुणांची असाइनमेंट अशी ५० गुणांची परीक्षा घेतली जाते. त्यानंतर १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल ५ फेब्रुवारीला लावण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला होता. जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये चूक झाल्याने विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. क्लेरीकल चुकीमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याचा हा सर्व पारकर लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. क्लेरीकल चुकीमुळे चार विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये हा प्रकार घडला आहे.

हे ही वाचा: 

तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा; संजय राऊतांची टीका

पुण्यातील वाहुतक कोंडीमुळे नागरिक हैराण: विजय वडेट्टीवारांनी केला आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss