Saturday, July 27, 2024

Latest Posts

गोळीबारा केल्यानंतर Ganpat Gaikwad यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गोळीबारा केल्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

Kalyan : सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी या घडत आहेत. तर दुसरीकडे गुन्हेगारीचे सत्र देखील वाढू लागले आहे. कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. उल्हासनगरमधून (UlhasNagar Crime News) गुन्हेगारीची एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबार शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे. या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या.या सर्व घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

गोळीबारा केल्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, “पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली.” “मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार सर्व ठिकाणी पाळून ठेवले आहेत. मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितलं आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले”, असंही गणपत गायकवाड यांनी सांगितलं आहे.


काय होते प्रकरण –

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss