कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत (म्हाडा) ५ हजार ३११ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. हक्काच्या, स्वमालकीच्या घराचे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यातील काही भाग्यवंतांचे स्वप्न आज या म्हाडाच्या सोडतीद्वारे पूर्ण झाले आहे याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचे सांगून सर्वसामान्य लोकांना म्हाडाची घरे वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
म्हाडाची घरे बांधताना कामांची गुणवत्ता राखली गेली पाहिजे, म्हाडाचे धोरण देखील सुलभ आणि सुटसुटीत असायला हवे तसेच आगामी वर्षात जास्तीत जास्त घरे नागरिकांना उपलब्ध व्हावीत यासाठी म्हाडाने प्रयत्न करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावर्षीच्या सोडतीमध्ये ज्यांना घरे मिळाली त्या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा:
अजय बारसकारांवर हल्ला होण्याची शक्यता; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘लॉकडाऊन लग्न’मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत