Saturday, July 27, 2024

Latest Posts

अजय बारसकारांवर हल्ला होण्याची शक्यता; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी असलेल्या अजय बारसकर यांना धमकी देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी असलेल्या अजय बारसकर यांना धमकी देण्यात आली आहे. एकेकाळी ते मनोज जरांगे यांचे चांगले सहकारी होते. मनोज जरांगे आणि अजय बारसरकार हे दोघं मिळून मराठा आरक्षणाच्या लढा देत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी अजय बारसकार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याच्या धमकी प्रकरणी पाच जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच जणांविरोधात मरीन ड्राईव्ह (Marine Drive) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत अजय बारसकर यांचा देखील समावेश होता. अजय बारसकर ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या फिरताना शुक्रवारी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर तिथे असलेल्या ३ व्यतींनी तिकडून पळ काढला. या धमकी विरोधात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अजय बारसकर यांनी जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने सगळीकडे वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. बारसकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज बारसकर यांची पत्रकारपरिषद होणार होती. मात्र त्यांच्यावर हल्ला होणार याचा संशय व्यक्त केल्याने पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोंघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांची अधिक चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.

अजय बारसकर यांनी दोन दिवसांआधी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मनोज जरांगे हा खोटारडा माणूस आहे. तो रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका झाल्या, असा आरोप अजय बारसकर यांनी केला आहे. मला धमकीचे अनेक फोन येत होते. गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाय प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला, असे अजय बारसकर म्हणाले.

हे ही वाचा:

‘लॉकडाऊन लग्न’मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत

कालवा समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय, पुणेकरांची पाणीकपात टळली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss