Tuesday, April 23, 2024

Latest Posts

भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईमधील(Mumbai) भाईंदरमध्ये अचानक झोपडपट्टीला आग लागली.

मुंबईमधील(Mumbai) भाईंदरमध्ये अचानक झोपडपट्टीला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे सगळीकडे खळबळ उडाली. भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाईंदर पूर्वेमध्ये असलेल्या गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आज सकाळी आग लागली आहे. या आगीमध्ये काही नागरिक जखमी झाले आहेत. अचानक लागलेल्या आगीची माहिती मिळतच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

भाईंदरमध्ये सकाळी अचानक लागलेल्या आगीत काही नागरिक जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. मीरा भाईंदर परिसरात लागलेल्या आगीमुळे अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. या आगीतून मोठ्या प्रमाणावर काळा धूर बाहेर पडत आहेत. आझाद नगरमध्ये आगीचा तांडव सुरु आहे.लागलेली आग विझवत असताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. आग विझवण्यासाठी मुंबई, ठाणे, वसई महानगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रे भाईंदरमध्ये मागवण्यात आली आहेत.

भाईंदर पूर्वेमध्ये असलेल्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात आझाद नगरमधील झोपडपट्टीला पहाटे ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये अनेकजण जखमी झाले असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलातील एक अधिकारी जखमी झाला आहे. आग विझवण्यासाठी २४ अग्निशमक वाहन आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, दीड लाख महिलांना सभेत संबोधित करणार

सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss