Wednesday, April 24, 2024

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, दीड लाख महिलांना सभेत संबोधित करणार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे यवतमाळमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथील महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांत उपस्थित असलेल्या दीड लाख महिलांना नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. यवतमाळमध्ये नरेंद्र मोदी येत असल्याने भारी येथे मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या भव्य मेळाव्यासाठी ४५ एकर जागेवर मंडप तयार करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टया त्यांचा हा दौरा महत्वाचा असणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या सभेची जोरदार तयारी केली जात आहे. सकाळी ७ वाजल्यापासून सभा मंडपाच्या कामाची सुरुवात झाली आहे. सुमारे ५०० पेक्षा जास्त मजूर या सभेची तयारी करत आहेत. सभा मंडपाच्या कामासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातील आग्रा, राजस्थान, हैदराबाद आदी राज्यातील मजूर कामासाठी आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ३० समिती स्थापन लार्ण्यात आल्या आहेत. अनेक मंत्री ,नेते सभेला उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यासाठी ७ हेलिपॅडची निर्मिती विमानतळावर करण्यात आली आहे. यवतमाळमधील रस्ते मोदींच्या आगमनासाठी तयार करण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. साडेतीन हजारापेक्षा जास्त पोलीस यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत. एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी ही पथक येणाऱ्या सर्व महिलांची तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडणार आहेत.

नरेंद्र मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ दौरा करणार आहेत. त्यांच्या सभेला रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

Exclusive : ‘टाईम महाराष्ट्र’ चा प्रश्न ऐकताच जयंत पाटीलांच्या घशाला पडली कोरड, अशी केली सारवासारवी…

ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा अर्थसंकल्प, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss