Monday, May 20, 2024

Latest Posts

Mumbra मधील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

मुंब्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas cylinder blast in Dombivali) घडला आहे.

मुंब्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas cylinder blast in Dombivali) घडला आहे. मुघल पार्क या इमारतीच्या ए विंगमध्ये एका भंगाराच्या दुकानामध्ये गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने हा भीषण स्फोट झाला आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंब्रा येथील चांदनगर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस लिकेज झाल्याने भडका उडाल्यामुळे तीन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे. या स्फोटात महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या तीन घरांचे देखील नुकसान झाले आहे. मनीषा मोर्वेकर यांच्या घरात गॅस लिकेजमुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. तसेच एक रिक्षा आणि एका चारचाकी वाहनांचा नुकसान झाले आहे. एका खाजगी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. या घटनास्थळी गॅस सिलेंडरच्या लिकेज झाला असल्याची प्रशासनाने दिली आहे. या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पीकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान, फायर वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहे.

घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा.

हे ही वाचा:

MMRDA बैठकीत खासदार DR. SHRIKANT SHINDE यांच्या मागणीला यश

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss