Monday, May 20, 2024

Latest Posts

ठाण्यात मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक

दुकानांवरील मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेली २५ नोव्हेंबरची मुदत संपली तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे

दुकानांवरील मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेली २५ नोव्हेंबरची मुदत संपली तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केट मधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत .तर दुसरीकडे ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. जर दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे,

मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेत आहेत . त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. मुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. नसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.

‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले आहेत . तसंच दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरु नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.

हे ही वाचा:

कल्याण स्टेशन परिसरात २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत होणार बदल

जाणून घ्या हिवाळ्यात मुळा कधी खावा आणि कधी नाही…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss