Monday, May 20, 2024

Latest Posts

नवी मुंबई हादरली; ४८ तासांत अनेक लहान मुले गायब

नवी मुंबईत अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत.

नवी मुंबईत अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. नवी मुंबईमध्ये काही अल्पवयीन मुलं अचानक गायब होत आहेत. गायब झालेली ही सर्व मुले लहान आहेत. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. ही सर्व मुले अचानक गायब होत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांचे अपहरण होत असल्याची पालकांची तक्रार आहे. तर अचानक होत असलेल्या अपहरणामुळे पोलीस देखील हादरून गेले आहेत.

नवी मुंबईमधून मागील ४८ तासात ६ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. मुले बेपत्ता होत असल्यामुळे पालकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. गायब झालेली सर्व मुले १२ ते १५ वयोगटातील आहेत. बेपत्ता झालेल्या मुलांचे अपहरण झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. या सर्व पालकांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार केली आहे. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली या परिसरातून अचानक गायब झाली आहेत. ही सर्व मुले ३ आणि ४ डिसेंबर पासून गायब झाली आहेत. या ६ जणांमध्ये एक मुलगा कोपरखैरणे मधून बेपत्ता झाला आहे. त्यानंतर दुसरा १२ वर्षाचा मुलगा असाच बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो ठाणे रेल्वे स्थानकात सापडला. या मुलांमध्ये काही मुलेही शाळेत गेल्यानंतर गायब झाली आहेत. रबाळे मधील एक मुलगा सार्वजनिक शौचालयात गेला होता. मुले अचानक गायब झाल्यामुळे पालक चांगलेच हादरून गेले आहेत. मुलांचे अपहरण करून त्यांचे काही बरेवाईट तर नाही झालं ना? अशी भीती पालक व्यक्त करत आहेत. मात्र मुले अशी अचानक बेपत्ता होत असल्यामुळे नवी मुंबईमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्यापासून राज्यात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मुले गायब होण्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. वी मुंबईच नव्हे तर या आधी कल्याण आणि टिटवाळ्यातूनही अनेक मुले गायब झाली आहेत. त्या सर्व मुलांचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून एक ३ वर्षाची लहान मुलगी गायब झाली होती. नोव्हेंबरमध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले होते. या मुलीने घरातच जीवन संपवल्याचे आढळून आले होते.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी केले गंभीर आरोप, बोली लावून अधिकाऱ्यांची बदली सुरू…

चक्रीवादळामुळे रद्द झालेली इंडिया आघाडीची बैठक १७ डिसेंबरला होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss