Saturday, March 2, 2024

Latest Posts

ठाणे जिल्ह्यात ४१ ठिकाणी एनआयएची छापेमारी,१४ जणांना घेतले ताब्यात

आयसीसशी (ISIS) संबधांच्या आरोपावरून एनआयएने (NIA) ठाणे (Thane News) जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे.

आयसीसशी (ISIS) संबधांच्या आरोपावरून एनआयएने (NIA) ठाणे (Thane News) जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्ब्ल ४१ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पडघ्यामध्ये ३१ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आली आहे. साकीब नाचण ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. पुण्यातील आयसीस प्रकरणामध्ये काही महिन्यांपूर्वी साकिब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

NIA ने पहाटेपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी तिथे छापेमारी करायला सुरुवात केली. तसेच कर्नाटकातील काही ठिकाणी देखील एनआयए कडून छापेमारी करण्यात आली. या सर्व छापेमारीचा इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशयावरून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर शेकडो जणांची शोध घेतला जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ जण हे पुण्यातील आहेत. या तिघांपैकी एकजण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जीद परिसरात राहणारा आहे तर घेजण मोमिनपुरा भागात राहतात. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी , कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासूनच छापेमारी करायला सुरुवात केली आहे. हसीब मुल्ला , मुसाफ मुल्ला , रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी ,आदिल खोत, मुखलीस नाचन , सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर के पी दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. १८ जुलै रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना पकडले होते. त्याचवेळी त्यांचा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाणार होता.

पुणे भागातील कोंढव्यातील तालाब मश्जीद परिसरात पहाटेपासूनच कारवाईला सुरुवात झाली आहे. या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरामध्ये सुमारे २५०० जणांची चौकशी सुरु आहे. NIA ने पहाटेपासूनच महाराष्ट्रातील काही भागात कारवाई कार्याला सुरुवात केली होती. तसेच कर्नाटकातील काही भागात एन आय ए कडून छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमधे पुण्यातील तिघांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

 बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अंदाजाला नेटकऱ्याची नाराजी,उर्फीची बरोबरी करणार…

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss