Thursday, February 29, 2024

Latest Posts

ठाण्यात आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन, भुजबळांची तोफ कोणावर धडाडणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, तसेच कुणबी नोंदी (Kunbi Records) शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती (Shinde Committee) तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी मेळावे होत आहेत. आज रविवारी १७ डिसेंबर रोजी ठाण्यातील (Thane District) भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या या सभेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सगळ्याच लक्ष लागले आहे. तसेच एकीकडे आंतरवली सराटी गावात मराठा समाजाची बैठक होत आहे तर दुसरीकडे ठाण्यात भुजबळांची ओबीसी सभा होणार आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत यासाठी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. यासाठी राज्यतील अनेक भागात ओबीसी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्शवभूमीवर आज ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या या सभेला भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याकडून सतत भुजबळ यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे आजच्या या सभेतून भुजबळ जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

शनिवारी वर्धा जिल्ह्यात देखील ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित राहणार होते. मात्र अकरा वाजता सुरु होणारी ही सभा दुपारी एक वाजता सुरु झाली. तरीही सभेच्या ठिकाणी गर्दीच नसल्याचे चित्र दिसून आले. या सभेला २५००० लोक येण्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला होता. पण ५०० लोकांची जमवाजमव करताना आयोजकांची दमछाक होतांना पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे, भुजबळांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत सभेला गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे वर्ध्यातील ही सभा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

हे ही वाचा:

PM Ujjwala Yojana, LPG सिलिंडर 600 रु… तुम्ही देखील घेऊ शकता लाभ!

मराठा आंदोलनाची २४ डिसेंबरपासून दिशा काय असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss