Sunday, March 3, 2024

Latest Posts

भिवंडीमधील वीटभट्टीवरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका

राज्यभरात वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदीवासी मजूर काम करत आहेत.

राज्यभरात वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदीवासी मजूर काम करत आहेत. या मजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे. याआधी असे आर्थिक पिळवणूक झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. भिवंडी तालुक्यातील चिंबी पाडा भागातील वीटभट्टी मालकाने आदिवासी मजुरांना आपल्या भट्टीवर विठबिगरी म्हणून कामाला ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच वीटभट्टी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख याची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर मंजू संतोष पवार तिचा पती संतोष पवार, मुलगा संदीप, सुनील आणि वडील लक्ष्मण सवरा हे सर्वजण मागील ८ वर्षांपासून काम करत आहेत. त्यासाठी त्याना ५ हजार रुपये बयाणा देऊन कामावर घेऊन जाण्यात आले. त्यानंतर त्यांना फक्त ८ रुपये कमी मोबदला देऊन राबवण्यात येत होते. तसेच इतर ठिकाणी कामाला गेल्यानंतर वीटभट्टी मालक तुमचे पैसे अजून फिटले नाही असे सांगून त्यांना राबवून घेत. त्यांना मारहाण आणि शिवीगाळसुद्धा करत असे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर मंजू संतोष पवार हिने आपल्यासोबत इतर मजुरांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची माहिती गावातील श्रमजीवी संघटनेच्या अलका भोईर यांना दिली. त्यानंतर संस्थापक विवेक पंडित यांनी मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वीटभट्टीवर जाऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर मंजू संतोष पवार यांसह दहा आदिवासी मजूर वेठबिगार म्हणून काम करत होते. त्यानंतर भिवंडी तालुक्यातील पोलीस ठाण्यात मंजू संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वीटभट्टी मालक सिद्दीकी शेख यांच्याविरोधात अट्रोसिटीसह विठबिगरी कायद्यावरून गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर विवेक पंडित यांनी तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ वेठबिगार मुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

देशाला स्वतंत्र मिळून ७६ वर्ष झाली तरीसुद्धा अनेक ठिकाणी मजुरांची पिळवणूक केली जात आहे. मुंबईपासून काही किलोमीटरवर असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील मजुरांची पिळवणूक होत आहे, हे दुर्दैव असून अश्या मालकांविरोधात कठोर कारवाई करून मजुरांचे पुनर्वसन करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.

हे ही वाचा:

शिर्डीमध्ये आजपासून ‘नो मास्क नो दर्शन’, पालकमंत्र्यांच्या मंदिर प्रशासनाला सूचना

Congress पुन्हा एकदा ऍक्टिव्हमोडमध्ये!, लवकरच ‘Bharat Jodo Yatra’चं दुसरं पर्व ‘Bharat Nyay Yatra’ होणार सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss