Saturday, March 2, 2024

Latest Posts

शिर्डीमध्ये आजपासून ‘नो मास्क नो दर्शन’, पालकमंत्र्यांच्या मंदिर प्रशासनाला सूचना

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचे (JN.1) रुग्ण वाढत चालले आहेत. त्यातच आता नाताळ सणानिमित्त सुट्टी लागल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमणावर गर्दी वाढली आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या (Shirdi Saibaba Mandir) दर्शन रांगेमध्ये भाविकांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या भाविकांकडे मास्क नसले त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, अश्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) शिर्डीतील साई संस्थानाला दिल्या आहेत.

साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्यामुळे शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र त्यातच आता कोरोनाच्या जेएन.१ (JN.1) या नवीन विष्णूने डोकेवर काढले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. तसेच महाराष्ट्रमध्ये कोरोना रुग्णानाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करावी, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिले आहेत. या आदेशाची अमंलबजावणी बुधवारपासून केली जाणार आहे. आता दर्शनासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना आणि भाविकांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

देशात जेएन.१ या नव्या विष्णूचे रुग्ण वाढल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. या विष्णूचा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र व गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. केरळमध्ये परेदशातून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. २२ जानेवारी २०२४ ला अयोध्यात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी लाखो लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसह ज्या व्यक्तींना आजार असतील त्यांना विशेष काळजी घ्यावी, गर्दीमध्ये जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आव्हान करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Congress पुन्हा एकदा ऍक्टिव्हमोडमध्ये!, लवकरच ‘Bharat Jodo Yatra’चं दुसरं पर्व ‘Bharat Nyay Yatra’ होणार सुरु

ख्रिसमसचा केक कट करताना त्यावर दारु ओतून आग लावत ‘जय मात’दी घोषणा दिल्याने रणबीर नेटकऱ्यांकडून ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss