Saturday, July 27, 2024

Latest Posts

गोळीबार प्रकरणामुळे तणावाचे वातावरण, कल्याण बंदची हाक…

गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली.

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. काल रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरचं नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला. या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.

काल रात्री झालेल्या गोळीबारामुळे उल्हासनगर, कल्याण सह आजूबाजूचा सर्व परिसर हा हादरला आहे. सगळीकडे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील संतापल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कल्याण बंद ची हाक देखील देण्यात आली आहे. या सर्व घडामोडीमुळे पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचं घर तसेच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. खबरदारी म्हणून माजी नगरसेवक, कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलं आहे. गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महेश गायकवाड यांच्या शिवसेना शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाडांसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी तिघे अद्याप फरार आहेत. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आज या सर्वांना कोर्टात हजार करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गोळ्या काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही २ गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss