Saturday, March 2, 2024

Latest Posts

ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या मृत्यूप्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

मागील काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa) एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

मागील काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa) एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर चार अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. १३ ऑगस्ट २०२३ रोजी ठाण्यातील या रुग्णालयात एकाच दिवशी १८ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

१३ ऑगस्ट २०२३ रोजी कळवा हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णांच्या मृत्यूनंतर कळवा हॉस्पिटल मधील प्रशासनावरती एकच ठपका लावण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हॉस्पिटलची चौकशी केल्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. या कमिटी मार्फत रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. या कमिटीमध्ये महाराष्ट्र स्वास्थ विभाग आयुक्त ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त आरोग्य सेवानिर्देशक मुंबई सहाय्यक निर्देशक अधिकारी होते. त्यानंतर कमिटीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला होता. या प्रकरणात आता दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे. परंतु ज्यावेळेस हे सर्व मृत्यू झाले तेव्हा वॉर्डमध्ये उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये आयुक्तांना त्यांची बाजू न कळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या वतीने हॉस्पिटलचे अधीक्षक राजेश बरोट आणि त्यांचे मेडिसिन डिपार्टमेंट अनिरुद्ध माळगावकर व इतर दोन ज्युनिअर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता चौकशी समितीने चौघांना नोटिसा दिल्या आहेत.

कळवा हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी झालेल्या १८ मृत्यू प्रकरणी २ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच दोन वरिष्ठ अधिकारी आणि दोन ज्युनिअर डॉक्टर यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. चौकशी समितीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Latest Posts

Don't Miss