Friday, March 1, 2024

Latest Posts

Thane Crime, मुख्यमंत्र्यांचे ठाणे हादरलं!, तिहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला आहे. पतीने क्रिकेटच्या बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला.

सध्या एकीकडे राज्याच्या राजकंट अनेक घडामोडी या होत आहेत तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढत चालले आहे. ठाण्यात सध्या अनेक गुन्हेगारीच्या घटना या घडत आहेत. अशातच पार्ट एक नवीन घटना ही समोर आली आहे. ठाण्यात तिहेरी हत्याकांड हा झाला आहे अंडी या मुले संपूर्ण ठाणे हे हादरून गेले आहे. या गुन्हयात पतीने क्रिकेटच्या बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. हि संपूर्ण धक्कादायक घटना ठाण्यातील कासारवडवली येथे घडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण हे पसरले आहे.

ठाण्यामध्ये पतीने क्रिकेटच्या बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. आरोपी अमित धर्मवीर बागडी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर येथील आहे. तो ३ ते ४ दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता. अमित बागडी याला दारुचं व्यसन होतं. तो कोणताही व्यावसाय करत नव्हता. घरगुती कारणामुळे हत्या झाल्याचं प्रथमिक महितीमधून समोर आलेय. २९ वर्षीय अमित बागडी याने पत्नी भावना हिला आधी संपवलं. भावनाचं वय २४ वर्ष इतकं होतं. त्यानंतर सहा वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांच्या मुलालाही संपवलं. आरोपीचे नाव अमित धर्मवीर बागडी असे आहे. मागील तन दिवसांपासून तो भाऊ विकास घधर्मवीर बागडी याच्याकडे राहत होता. २९ वर्षीय अमित याने बायको आणि दोन मुलांना क्रिकेटच्या बॅटने संपवलं. जयवंत निवृत्ती शिंगे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्यानंतर आरोपी अमित हा पळून गेलेला आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मयत व्यक्ती भावना ही सख्या लहान दिरासोबत वास्तव्यास राहत होती. घटना घडली त्या ठिकाणी दोन मुलांचे सोबत राहत होती. गेले तीन दिवसापासून आरोपी मयत व्यक्ती हिचा पती आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून घरी आला होता. त्यांच्यासोबत तो राहत होता. आज सकाळी आरोपीचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्याच्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावना तसेच दोन मुले हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. कासारवडवली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss