Saturday, March 2, 2024

Latest Posts

THANE: महायुतीची सत्ता आल्यावर उत्सवावरील निर्बंध दूर केले- CM EKNATH SHINDE

डोंबिवली जिमखान्याच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उत्सव – २०२३ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी भेट देऊन डोंबिवलीकर नागरिकांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी आणि डोंबिवलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध दूर करण्यात आले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी कायम निर्णय घेतले. मुंबईतील स्वच्छतेला आपण महत्त्व दिले असून हळूहळू ही मोहीम राज्यभरातील सर्व शहरात राबवण्याचा आमचा विचार असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी सांगितले. 

डोंबिवली शहर म्हणजे साहित्य, कला, संस्कृती यांचे माहेरघर

डोंबिवलीत गुडीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेप्रमाणेच डोंबिवली जिमखाना उत्सवाचीही अनेक जण वाट पाहात असतात. डोंबिवलीच्या सांस्कृतिक जडण-घडणीत डोंबिवली जिमखान्याचे मोठे योगदान आहे. तसेच कोविडच्या संकट काळातही डोंबिवली जिमखान्याने पुढे येऊन रुग्णालय उभारणी करत महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यामुळे जिमखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी यावेळी केली. तसेच या उत्सवाच्या निमित्ताने याठिकाणी साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिर प्रतिकृतीचेही मुख्यमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले. डोंबिवली शहर हे साहित्य, कला, संस्कृती यांचे माहेरघर आहे. या शहराने विविध क्षेत्रात काम करणारे अनेक नामवंत आजवर दिले आहेत. शहरात सुरू करण्यात आलेल्या या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना बाजारपेठ, कलाकारांना व्यासपीठ आणि महिला बचत गटाच्या उत्पादनांना एक विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा आनंद वाटत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी व्यक्त केले. 

कल्याण महोत्सव २०२३

कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या कल्याण महोत्सव २०२३ कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी संवाद साधला. डोंबिवली प्रमाणेच कल्याणमध्ये देखील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अशा उत्सवांची समाजाला गरज आहे. आपली दुःख अडचणी बाजूला सारून थोडा वेळ मनाला विरंगुळा मिळवून देण्याचे काम असे महोत्सव करत असतात. याठिकाणी आई तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली आहे. आबालवृद्धांना एकत्र आणणारा असा हा सोहळा असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश गायकवाड तसेच कल्याण डोंबिवली विभागातील शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss