Sunday, May 19, 2024

Latest Posts

THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकाच दिवसाच्या अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोकांतिका व्यक्त केली जात आहे. 

सध्या थंडीच्या दिवसात धुक्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे अपघातांचे सत्र वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी अपघात घडून आले आहेत, आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी (BHIWANDI) मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला असून वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहिल्या अपघातात महापालिकेतील सफाई कामगार सागर परमार आपल्या मित्रासह कल्याण परिसरातून भिवंडीकडे येत होते आणि त्यावेळी अचानक त्यांच्या दुरचा तिला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. धडक दिल्यानंतर सागर रस्त्यावर कोसळले. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत भिवंडी-नाशिक (BHIWANDI NASHIK WAY) मार्गातील चाविंद्रा परिसरातून कुटुंबियांसह ढाब्यावर जेवण करून आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना मागून येणाऱ्या ट्रकचा कट लागल्याने दुचाकी स्वाराचा तोल गेला. यामुळे दुचाकी स्वार आणि मागे बसलेली पत्नी रस्त्यावर पडली आणि त्यानंतर महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमी झाले आहेत. याशिवाय, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकाच दिवसाच्या अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोकांतिका व्यक्त केली जात आहे.

डोंबिवलीत रिक्षाचा अपघात 

डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने हा अपघात झाला आहे. मात्र इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे ती रिक्षा लगेच थांबवल्याने मोठे नुकसान झाले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रिक्षातील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटली , रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. त्यानंतर स्थानिक रहिवाश्यांच्या सतर्कतेमुळे रिक्षा थांबवत रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकवर कारवाई करत त्याला ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

पुण्यात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss