Sunday, May 19, 2024

Latest Posts

ठाण्यात दुर्घटना!, मेट्रो ४ च्या लोखंडी गर्डनची प्लेट कोसळून महिलेचा मृत्यू

आज सकाळी ठाण्यात (thane) एक अत्यंत दुर्दैवी घटना हि घडली आहे. ठाण्यात मेट्रो ४ (Metro 4) च्या गर्डनची लोखंडी प्लेट कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी ठाण्यात (thane) एक अत्यंत दुर्दैवी घटना हि घडली आहे. ठाण्यात मेट्रो ४ (Metro 4) च्या गर्डनची लोखंडी प्लेट कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हि महिला वेचण्यासाठी अली होती. आणि तेव्हा तिच्या अंगावर मेट्रोचे बॅरेकेटींग पडला. हा बॅरेकेटींग जास्त वजनाचा होता. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलजवळ (Viviana Mall) हि घटना घडली आहे. या सर्व संदर्भात स्थानिकांनी माहिती देताच राबोडी पोलिसांनी घटनांसाठी या ठिकाणी धाव घेतली. महिलेला बाहेर काढण्यात आले असून तिच्या विषयी सविस्तर तपास हा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत आता मेट्रोच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

आज सकाळी ठाण्यातील विवियन मॉलजवळील कॅडबरी जंक्शन ते कापूरबावडी (Cadbury Junction to Kapurbavadi) येथे मेट्रोचं काम सुरू आहे. या ठिकाणी हि सर्व गटानं घडली आहे. सुनीता बाळासाहेब कांबळे असं या मृत महिलेचं नाव आहे. ती तिथे भंगार उचलण्यासाठी आली होती. आणि तिचा तोल जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता. या महिलेचं वर ३७ वर्ष आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर मधील आंबेडकर चाळमध्ये ती महिला राहत होती. आज गुरुवार दि ५ जानेवारी रोजी सकाळी ९. ३०ते १० च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच त्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पिकअप वाहनासह, राबोडी पोलीस कर्मचारी आणि वर्तक नगर पोलीस कर्मचारी एका रुग्णवाहिकेसह उपस्थित होते. आता या महिलेचा मृतदेह ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

हे ही वाचा:

बादशाहची लेक आणि बिग बींचा नातू एकत्र?, चर्चाना आलं उधाण

‘दिपवीर’च्या शाही विवाहाला एकूण किती खर्च लागला तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Shakambhari Purnima नेमकी आहे तरी काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss