Saturday, July 27, 2024

Latest Posts

Ulhasnagar Firing: Mahesh Gaikwad यांना मिळणार डिस्चार्ज, कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

डिस्चार्ज मिळण्याच्या आनंदात कल्याण शहरात ठिकठिकाणी स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाड यांना २६ फेब्रुवारी म्हणजेच आज डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड हे रुग्णालयातून सुखरूप घरी परतणार, हे समजताच त्यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते.

२४ दिवसांनंतर मिळणार डिस्चार्ज

२ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्थानकात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर २४ दिवस उलटल्यावर गोळीबार हल्ल्यात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळण्याच्या आनंदात कल्याण शहरात ठिक-ठिकाणी स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.

बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी करत असून मोठ्या प्रमाणात चाहते आणि समर्थक गर्दी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण-डोंबिवली या ठिकाणी बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन होऊ शकेल, म्हणूनच कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

गोळीबार घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना पोलिसांनी अटक केले. तर इतर आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, विकी गणात्रा, नागेश बडेकर हे तीन जण फरार आहेत. व्यावसायिक आणि भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यामध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश आहे तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

काय होते प्रकरण –

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss