Saturday, July 27, 2024

Latest Posts

ULHASNAGAR FIRING: जे झालं ते चुकीचंच…MAHESH GAIKWAD यांच्या पत्नी म्हणाल्या

उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाड यांना २६ फेब्रुवारी म्हणजेच आज डिस्चार्ज मिळाला आहे. महेश गायकवाड हे रुग्णालयातून सुखरूप घरी परतणार, हे समजताच त्यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज २४ दिवसांनंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

डिस्चार्ज मिळाल्यावर पत्नीची प्रतिक्रिया काय? 

डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांनी त्यांचे मत व्यक्त केले. डिस्चार्ज मिळाल्यामुळे चांगलं वाटतंय. पण गणपत गायकवाड यांनी खूप चुकीचं केलं. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे पुन्हा अशी घटना कोणासोबत घडणार नाही, असे सारिका गायकवाड म्हणाल्या.

बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी केली असून मोठ्या प्रमाणात चाहते आणि समर्थक गर्दी पाहायला मिळाली. कल्याण-डोंबिवली या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. शक्ती प्रदर्शन होऊ शकेल या पार्श्वभूमीवर कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

नेमका काय होता वाद? 

काही दिवसांपासून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या होत्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांनतर आता महेश गायकवाड हे सुखरूप असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss