Tuesday, April 16, 2024

Latest Posts

नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी बनवण्यात येणारा सभामंडप कोसळला, ४ कामगार जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत. या कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला आहे. यामध्ये ४ कामगार जखमी झाले आहेत. २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत, तिथे त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेसाठी भारी गावामध्ये ४५ एकर जागेवर मंडप उभारण्यात येणार आहे. त्यातील एक डोम उभे करण्याचे काम सुरु असतानाच पिल्लर जमिनीतून निघाला. त्यानंतर खांब खाली क्रेनवर कोसळले.त्यावेळी तिथे काही कामगार होते. त्यातील ४ कामगार या दुर्घटनेमध्ये जखमी झाले आहेत.

२८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना मोदी संबोधित करणार आहेत. ४५ एकर भव्य जागेत मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची तयारी करत असताना सभा मंडपाचे तीन पिल्लर खाली कोसळले. त्या ठिकाणी अनेक कामगार काम करत होते. त्यातील काही कामगार या दुर्घटनेमध्ये जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. २८ फेब्रुवारीला त्यांचा यवतमाळ दौरा असणार आहे. ते चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहेत. २००४ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. त्यानंतर ते २० मार्च २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतऱ्यांसोबत संवाद साधला होता.

हे ही वाचा:

शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एकेरी मार्ग खुला

शारीरिक अडचणी असतांना सुद्धा पवार साहेब रायगडावर गेले; छगन भुजबळांनी केले शरद पवारांचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss