Sunday, April 28, 2024

Latest Posts

शारीरिक अडचणी असतांना सुद्धा पवार साहेब रायगडावर गेले; छगन भुजबळांनी केले शरद पवारांचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला काल तुतारी हे चिन्ह देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला काल तुतारी हे चिन्ह देण्यात आले. या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर झाले. शरद पवार हे ४० वर्षानंतर रायगडावर गेले होते. अनेक वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेल्याने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे रायगडावर गेले ही कौतुकास्पद आहे, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी किती वाजेल? असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुकीमध्ये तुतारी किती वाजेल हे मी काही सांगू शकत नाही. एवढे वय असून तसेच शारीरिक अडचणी असतांना सुद्धा पवार साहेब रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे. एखादी नवीन चिन्ह मिळते तेव्हा या चिन्हाचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात करावा लागतो,असे छगन भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार आहे. जो पहिल्यापासून दिशाहीन होता. तो पुढची दिशा काय ठरवणार? त्याला दिशा कळली तर पाहिजे की योग्य दिशा कोणती आहे, असे म्हणत छगन भुजबळांनी जरांगेंवर टीका केली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मूभा आहे. आप किती लहान पक्ष होता. तो आता मोठा पक्ष झालाय, असे छगन भुजबळ म्हणाले.

उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणूका असतात. आचारसंहिता लागू होते. म्हणूनच एक महिना आधी अधिवेशन घेतले जाते. पुढील अधिवेशनात संपूर्ण बजेटची मांडणी केली जाईल. ज्यांना आरोप करायचे आहेत ते करतायत. केंद्राचे जे बजेट मांडले जाते त्याच्या आधारे आपण बजेट तयार करून मांडत असतो. अधिवेशन संपल्यावर चार-पाच दिवसात आचारसंहिता लागू होईल मग काय करणार? ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते त्यावेळी असेच करत होतो, असे छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आले अडचणीत, वाघाची शिकार केली अन्…

नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते – CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss