Wednesday, April 24, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणाची लढाई अखेर संपली, एका रात्री नेमकं काय झालं?

मराठा आरक्षणाचा लढा अखेर आज संपला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा अखेर आज संपला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाची लढाई जिंकली आहे. सरकारकडून सगेसोयऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीन मागण्या मान्य झाल्यामुळे सगळीकडे आनंद आहे. विशेष बाब म्हणजे सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू करण्यात आला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने रात्री जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आहे.

रात्री उशिरा बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आपल्या लढयानुसार ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना लवकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ५७ लाखपैकी ३७ लाख प्रमाणपत्र वाटले असून, त्याचा डाटा लवकरच आपल्याला मिळणार आहे. सगेसोयऱ्याचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. सरकराने दिलेल्या राजपत्रावर आपल्या वरिष्ठ वकिलांची तीन तास चर्चा झाली. हायकोर्टाच्या वकीलांनी याची पु्र्ण तपासणी केली आहे. आपली लढाई यासाठी होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. सोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला वेळ दिला आहे. तसेच तालुका स्तरावर वंशावळी जोडण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. मराठवाड्यात सापडलेल्या कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. ओबीसी आरक्षणात असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठा मुलांना देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. त्यांचा विरोध आता संपला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिणार आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘नकली राजकीय हिंदूत्ववाद्यांपासून सावध’… मिरारोड प्रकरणावर किरण मानेंची खास पोस्ट

हिवाळ्यात कच्चे खोबरे खात आहात,तर शरीरासाठी आहे फायदेशीर,जाणुन घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss