Tuesday, April 16, 2024

Latest Posts

२० फेब्रुवारीला मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्याची शक्यता

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. पण आता लवकरच आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. २० फेब्रुवारीला राज्य सरकारकडून एकदिवसीय अधिवेशन बोलवले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर कुणबी नोंदी सापडल्यावर मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी आरक्षण लागू व्हावे, अशी प्रमुख मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वेशीवर आले होते. मुंबईमध्ये आल्यानंतर सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला. सगेसोऱ्यांची व्याख्या मान्य करत मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याचा उल्लेख होता. हाच मसुदा असलेला कायदा विधिमंडळात मंजूर होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणासाठी बसले होते. हे आंदोलन चालू असताना सराटी मध्ये पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या लाठीमारात अनके जण जखमी झाले होते. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली. तेव्हापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे चर्चेत आहेत. त्यानंतर मनोज जरांगे यांनी दोनदा आंतरवली सराटीमध्ये उपोषण केले होते. मात्र त्यावेळी सरकारने त्यांची समजूत काढण्यात यश मिळवले होते. त्यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणासाठी बसले. काही दिवसांआधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने आले होते. मराठा आंदोलकांनी जालना ते नवी मुंबई असा लाँग मार्च काढला होता. ते पायी चालत मुंबईच्या वेशीवर पोहचल्यानंतर सरकारकडून अध्यादेश देण्यात आला.

मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर पोहचल्यानंतर त्यांच्यासोबत सरकारच्या शिष्ट मंडळाने चर्चा करण्यास सुरुवात केली. मराठा आरक्षणाचा आदेश निघाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे-पाटील यांनी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. पण काढण्यात आलेल्या अध्यादेशावर अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत.

हे ही वाचा: 

‘साधी माणसं’ या मालिकेतून शिवानी बावकर-आकाश नलावडे ही जोडी येणारं प्रेक्षकांच्या भेटीला

लोकसभेसाठी सर्वांचा वापर करतील आणि नंतर घरी पाठवतील- Ambadas Danve

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss