राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधून काढता पाय घेतला. आता लवकरच ते भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. याबाबत राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशोक चव्हाण यांचा प्रवेश होत असताना काही काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्यासोबत बोटावर मोजण्याइतके लोकं आहेत. असे मत छत्रपती संभाजीनगर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडले. भाजपची ताकद कमी झालेली आहे, त्यामुळे लोकं फोडण्याचे काम सुरू आहे. भाजप राष्ट्रीय स्तरावरील पार्टी आहे. देवेंद्र फडणवीस आज सुपर पॉवर आहेत का? असा सवाल यावेळी दानवे यांनी उपस्थित केला. लोकसभेला सर्वांचा वापर करून नंतर आपल्या घरी पाठवतील. भाजपचे टार्गेट फक्त लोकसभा आहे. खोट्या गप्पा मारणं हे सोलापूर घरकुलातील एक जिवंत उदाहरण आहे. आमच्यातून जे गद्दार लोकं बाहेर गेले त्यांची परिस्थीती नंतर काय होईल? असा प्रश्नसुद्धा माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे यांनी विचारला.
मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे-पाटील यांची फसवणूक राज्य सरकारने केली. त्यांचा साधेपणा पाहून फसवणूक झाली. राज्यात सध्या गुंडाराज सूरु आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होत आहेत. असे म्हणत उल्हासनगर येथील गोळीबार आणि दहिसर येथे झालेला अभिषेक घोसाळकर यांची गोळीबाराने झालेली हत्या या प्रकरणाची आठवण करून देत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारबाबत रोष व्यक्त केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी स्वत:चे १२ वाजवून घेतले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना महायुतीवर निशाणा साधला. अशोक चव्हाण स्वत:ची अवहेलना करुन घेत आहेत. कॉंग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. मोदी देशाला काय तोंड दाखवणार? असा सवाल यावेळी खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा
‘साधी माणसं’ या मालिकेतून शिवानी बावकर-आकाश नलावडे ही जोडी येणारं प्रेक्षकांच्या भेटीला