Saturday, May 18, 2024

Latest Posts

Sharad Pawar Live | खरी शिवसेना कोणाची हे कोर्टात कळेल, शरद पवारांचे व्यक्तव्य

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमार्फत संवाद साधला.

औरंगाबाद : सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमार्फत संवाद साधला. या संवादात पवारांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले त्याचबरोबर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटावर व उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्या.

काय म्हणाले शरद पवार ?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ” कोणताही बंड हा एका दिवसात होत नाही त्याची आधीपासून तयारी असते. पण या नवीन सरकार स्थापनेसाठी केवळ 48 तासात निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यपालांकडे कष्टाचे काम होते असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला.

“सध्याची राजकीय स्थिती पाहता एकही सेकंद वाया न घालवता जोमाने कामाला लागा असं मी म्हटलं होतं, याचा अर्थ असा नाही की मध्यवर्ती निवडणुका लागतील” याचे स्पष्टीकरण शरद पवारांनी यावेळी दिले. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पवारांनी नाव न घेता टीका केली पवार म्हणाले की, “सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेला आता स्वस्थ झाला असेल”, पवार म्हणाले.

हेही वाचा : 

CM live | आम्हाला पण बऱ्याच नोटीसा आल्या, न्यायालयावर आमचा विश्वास आहे : एकनाथ शिंदे

शरद पवारांनी त्यांच्या काळातील जुन्या राजकारणातील आठवणींना उजाळा देत म्हणाले. “आमच्या वेळी देखील आम्ही बंड करायचो पण आमचा बंड हा सहा दिवसात संपायचा परंतु आम्ही कोणाला कुठे घेऊन गेलेलो नाही”. अशा शब्दात पवारांनी शिंदे गटाला टोला लगावलाय. त्याच बरोबर औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतरावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली.

‘आरे वाचवा’ आंदोलनात आदित्य ठाकरेंचा सहभाग, नव्या सरकारवर केली टीका

Latest Posts

Don't Miss