Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘आरे वाचवा’ आंदोलनात आदित्य ठाकरेंचा सहभाग, नव्या सरकारवर केली टीका

नव्या सरकारच्या स्थापने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबई : नव्या सरकारच्या स्थापने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार असल्याचे चित्र दिसत आहे. आज आरेसंदर्भातल्या निर्णयाविषयी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ‘आरे वाचवा’ आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या आरे मेट्रो कारशेडसंदर्भातल्या निर्णय़ावर जोरदार टीका केली आहे.

 या आंदोलनात आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाविषयी माहिती दिली. ते म्हणाले की,” महाविकास आघाडी सरकार मुंबईची काळजी घेणारे होते, याच आरेत आम्ही 808 एकर जंगल म्हणून घोषित केले . आम्ही आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले. अंतर्गत रस्ते आम्ही पाठपुरावा करुन जंगलात घेतले नाहीत आणि रस्त्याचे काम हाती घेतले. रस्ते काँक्रिटीकरणात एकही झाडे तोडले नाही. आरेतून मेट्रो कारशेड हलवून ते कांजुरमार्गला नेण्याचेही प्रयत्न केले.मविआ सरकार मुंबईची काळजी घेणार होते”. असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

हेही वाचा : 

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने केलं, भारत क्रिकेट संघाचे कौतुक

“आम्ही जंगल वाचण्यासाठी केंद्रालाही विनंती केली. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हे मी आधीही सांगितलं होतं, उद्धव ठाकरेंनीही हे सांगितलं होतं. नवीन सरकारचा पहिलाच निर्णय़ मुंबईच्या विरोधातला आहे. आरेवरचे आमच प्रेम आणि त्यावर राग ठेवून या सरकारने कारशेड इथेच उभारण्याचा निर्णय़ घेतलेला आहे. याच आम्ही निषेध करू” असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलंल्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण, इंस्टाग्राम हॅण्डलवरून दिली माहिती

Latest Posts

Don't Miss