Saturday, May 18, 2024

Latest Posts

CM live | आम्हाला पण बऱ्याच नोटीसा आल्या, न्यायालयावर आमचा विश्वास आहे : एकनाथ शिंदे

आतापर्यंत बंडकर आमदारांवर कारवाईच्या अनुषंगाने शिवसेनेने आमदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या बाबतीत येत्या काही दिवसांमध्ये सुनावणी होणार आहे.

मुंबई : आतापर्यंत बंडकर आमदारांवर कारवाईच्या अनुषंगाने शिवसेनेने आमदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या बाबतीत येत्या काही दिवसांमध्ये सुनावणी होणार आहे. असे असताना स्वीधी मंडळ सचिन राजेंद्र भागवत यांनी शिवसेना आणि शिंदे घाटांच्या आमदारांना नोटीस बजावले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता कोणत्या मार्गावर वळण घेणार आहे याची उत्सुकता महाराष्ट्रातील नेते मंडळींना लागून राहिली आहे.

विधानसभेत बहुमत चाचणीच्या दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटातूनही चारी करण्यात आला होता. या माध्यमातून आपलेच पक्ष खरा असे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आला त्यामुळे नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात शिंदे गट मेळावा यात प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले, “आम्हाला पण अशा बऱ्याच नोटीसा आल्या पण आमचा न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे”. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी आगामी काळातील निवडणुकांवर देखील भाष्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले “येत्या काळातील निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मी निवडणुका आयोगामुळे मांडणार आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे या निवडणुका स्थगित करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

 हेही वाचा : 

‘आरे वाचवा’ आंदोलनात आदित्य ठाकरेंचा सहभाग, नव्या सरकारवर केली टीका

Latest Posts

Don't Miss