Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते Samruddhi Mahamarg च्या दुसऱ्या टप्प्याचं झाले उद्घाटन

आजपासून अखेर नागपूर-मुंबई या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले आहे.

आजपासून अखेर नागपूर-मुंबई या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले आहे. अखेर आजपासून शिर्डी-भरवीर हा मार्ग खुला करण्यात आला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरमधील कार्यक्रम आटोपून शिर्डीकडे प्रस्थान केलं. शिर्डी येथे आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले.

 आज अखेर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन हे करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून शिर्डी-भरवीर हा मार्ग खुला करण्यात आला आहेहा दुसरा टप्पा खुला करण्यात आल्यामुळे आहे नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर अवघ्या ६ तासात पूर्ण करता येणार आहे. या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते इगतपुरी आहे. हा टप्पा जवळपास ८० किलोमीटरचा आहे. त्यामुळे आता शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या आता ४० ते ४५ मिनिटात पार करता येणार आहे. तसेच ज्या प्रवाशांना शिर्डी ला जायचे आहे अश्या सर्व प्रवाशांसाठी हा दुसरा टप्पा नक्कीच फायदेशीर असणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. नागपूरहून इगतपुरीपर्यंत आता नॉनस्टॉप प्रवास करता येणार आहे.

तसेच यापूर्वी या महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उदघाटन हे झाले होते. डिसेंबर २०२२ मध्ये नागूपर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हा पहिला टप्पा ५०१ किलोमीटरचा आहे. आता हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss