Saturday, July 27, 2024

Latest Posts

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. यावेळी वेगवेगळ्या संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे नागपूरमधील विधानसभेवर अनेक आंदोलन धडकत आहेत. काही शासकीय संघटनांनी काम बंद करण्याची हक दिली आहे. अशातच आता अखिल भारतीय सरपंच, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना, संगणक परिचालक संघटना आदीं संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून तीन दिवस काम बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता आहे.

एकीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) संपाची (Strike) हाक देणाऱ्या शासकीय कर्मचारी संघटनांची समजूत काढत नाही तेवढ्यातच सरपंच (Sarpanch), ग्रामसेवक (Gram Sevak) , कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी (Gram Panchayat Computer Operato) संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. ज्यभरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी व संगणक परिचालक यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये सुमारे २७ हजार ग्रामपंचायत आणि ६० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यअध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिली आहे.

‘या’ आहेत प्रमुख मागण्या:-

सरपंच, उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत
मानधनात भरीव वाढ व्हावी
नानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी
विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन वेतन देण्यात यावे
निवृत्ती वेतन लागू करावे आणि उपदान लागू करावे
भविष्य निर्वाह निधी रक्कम इपीएफ कार्यालयात जमा करणे
यासह संगणक परिचालकांच्या मागण्यांसाठी राज्यातील सर्वच ग्रामपंचायती १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद पाळणार आहेत.

हे ही वाचा:

PUNE: पोलिसांनी मुलं आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ फुलवली

MAHARASTRA: अपघातांचे सत्र सुरूच, पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss