मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटी मध्ये उपोषणासाठी बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी आता वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. मागील चार दिवसांत त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे. जरांगे याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंची प्रकृती खालावल्याने अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील अनेक भागात संप पुकारण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांकडून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. मराठा समाजाने संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पुण्यातील देवाची आळंदी बंद ठेवण्यात आली आहे. त्याला आळंदीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर, मनमाड, बीड, बारामतीमध्ये मराठा संघटनांनी बंद पुकारला आहे. तसेच ग्रामीण भागात बंद ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंदापूर, दौंड, पुरंदरमध्ये मराठा बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांना सोमवारी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पाणी पिण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी कोणाचे ऐकले नाही. मनोज जरांगे पाटील वैद्यकीय तपासणीकडून पाहणी किंवा उपचार करण्यास नकार देत आहेत.
आरक्षणाच्या मागणीवरून जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. बीड जिल्हायात आज सकल मराठा समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आला आहे. बीडमधील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील जमाबंदीचे आदेश बीडमध्ये लागू करण्यात आली आहे. या बंदला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्शवभूमीवर संपूर्ण बीड शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हे ही वाचा:
Valentines Day निमित्ताने Hardik Pandya पत्नीला दिल्या शुभेच्छा!, तर नताशा राहते करोडोंच्या घरात…