Tuesday, April 23, 2024

Latest Posts

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस, पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा दिला इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटी मध्ये पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर सलाईन लावून उपचार केले जात आहे. सरकारने दिलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. येणाऱ्या पुढील काही दिवसांत सरकारने दिलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा एकदा मुंबईला येऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना काल सलाईन लावण्यात आली होती, मात्र त्यांनी सलाईन काढून टाकली. तसेच त्यांच्या उपोषण स्थळी मोठी गर्दी झाली आहे.

मराठा आरक्षणावर सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा मुंबईमध्ये येऊन उपोषण करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगेची मागणी मान्य करणार का हे पाहणं महत्वाचे असणार आहे. मनोज जरांगे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, सरकारच्या उरावर बसून अमंलबजावणी करून घेणार, तसं नाही झालं तर उपोषण करत मुंबईमध्ये घुसणार, असे जरांगे म्हणाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहेत.दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. काल पार पडलेल्या राज्य सभेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पार पडलेल्या या बैठकीमध्ये २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, तर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात पात्र मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसल्यानंतर सरकारला जाग आली आहे असे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार ‘कन्नी’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी अत्याधुनिक उद‌्वाहनाची सोय करावी, Ajit Pawar यांचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss