Friday, April 19, 2024

Latest Posts

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

राज्यभरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

राज्यभरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगेंनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता मनोज जरांगे मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर पुढील दोन तासांत पुढील निर्णय जरांगे घेणार आहेत. मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहेत. रात्री संचारबंदी लागण्याची शक्यता आहे. मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. संचारबंदी लावली किंवा काही केलं तरी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आंदोलकांनी पोलिसांना त्रास देऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

रात्री आमच्यासोबत साडेतीनशे गाड्या होत्या. आमच्यासोबत महिलासुद्धा होत्या. रात्री आमच्यावर हात उचलण्याचा डाव होता,पण आम्ही तो हाणून पाडला आहे. तसेच हे सगळं देवेंद्र फडणवीस यांनी करायला सांगितले होते. तू चूक केली आहे, मला सागर बंगल्यावर आमंत्रण दिले होते. संचारबंदी लावल्याने सुट्टी आहे असे तुला वाटत असेल तर सुट्टी नाही. अजूनही मराठ्यांची लाट उसळू नको, असे मनोज जरांगे म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर आम्ही पुन्हा आंतरवली सराटीमध्ये आज जाणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ. तिथे मी उपचार घेणार आहे. संचारबंदी असल्याने सर्वांनी आपापल्या गावाकडे जावे. आपल्यासोबत दगाफटका करणे एवढे सोपं नाही. त्यामुळे राज्यभरातील मराठा आंदोलकांनी शांत राहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात मराठा आंदोलकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात आहेत. त्याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र आले आहेत.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

मला नोबेल प्राईज मिळावे असे केजरीवाल का म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss