Thursday, May 9, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस आहे. आज त्यांनी आंतरवलीमध्ये निर्णयक सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे,माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केले आहे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आजच्या भाषणात बोलल्याप्रमाणे ते आता आंदोलनास्थळावरून मुंबईमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. या सर्व प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधळी धरणावर आले होते. मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देऊन बोलणे टाळले. फडणवीस म्हणाले की, ‘मनोज जरांगे काय बोलले मी ऐकलेच नाही. यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ.’

देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेचे माणसे आणि अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. त्याचा काही तरी गेम करावा लागेल किंवा याचे एन्काऊंटर करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो, असे जरांगे म्हणाले. बारसकर हा देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला माणूस आहे. मीडियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काम फक्त देवेंद्र फडणवीस करत आहेत. गुलाल उधळला नाही, त्यामुळे यांचा अपमान आहे. त्याच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवुन दाखवू, असे आहे. ज्याचे ऐकले नाही त्याला संपवतो. देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत. एकनाथ शिंदेला काहीच करू देत नाहीत,असे मनोज जरांगे म्हणाले. तर मनोज जरांगे हे आंदोलनस्थळावरून आता मार्गस्थ झाले आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे आता प्रकृती ठिक नसल्याने ते चालत न जाता गाडीमध्ये बसले आहेत. मराठा बांधवांचा मोठा जमाव त्यांच्यासोबतस असलेला पाहायला मिळत आहे. जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे, कारण रात्रीपासून त्यांनी पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मनोज जरांगे यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

भविष्यातील विजयाचं रणशिंग रायगडावरून फुंकलं जाणार- जयंत पाटील

लोकसभेसाठी आम्हाला जागा द्यावी हा आमचा आग्रह, आम्हाला सिरियसली घ्यावे – रामदास आठवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss