गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत आता खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाला सुरुवात केली असून उपोषणादरम्यान वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणावर नारायण राणे यांनी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. असे ते म्हणाले आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून नारायण राणे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत!
कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांकडून मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. मराठा समाजाने संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पुण्यातील देवाची आळंदी बंद ठेवण्यात आली आहे. त्याला आळंदीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये. असे राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.
हे ही वाचा:
Valentines Day निमित्ताने Hardik Pandya पत्नीला दिल्या शुभेच्छा!, तर नताशा राहते करोडोंच्या घरात…