जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री…काय म्हणाले Sanjay Shirsat?

जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री…काय म्हणाले Sanjay Shirsat?

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक भूमिका घेतील असे मत मांडले. मुंबईत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. आणि आता हे त्यांचा वाद आहे आमचा आणि त्यांचा ह्या वादामध्ये काही संबंध नसल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. शिवसेना जागा वाटप यादीबाबत विचारले असता, संजय शिरसाट म्हणाले की, यामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे कारण; उमेदवारांची बदली आणि जागा लवकरात लवकर आमचे पक्ष निर्णय घेतील आणि जवळपास परवा ही यादी कदाचित येतील.

शिवतारे अपक्ष म्हणून लढत असण्याबाबत शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विषयावर निर्णय घेतील आणि शेवटी लोकशाही आहे जर काही कार्यकर्त्यांना अपक्ष लढायचं असेल तर ते लढू शकतात. पण आतापर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेला नाही, जेव्हा फॉर्म ते लोक भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक भूमिका घेतील, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या, छगन भुजबळांची मागणी

खैरे दानवे वाद अखेर मिटला, वाद संपल्यानंतर अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version