Thursday, May 9, 2024

Latest Posts

खैरे दानवे वाद अखेर मिटला, वाद संपल्यानंतर अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर मागील अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील वाद अखेर मिटण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये माझे नाव असणे किंवा नसणे महत्वाचे नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचे, अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी दानवे आणि खैरे दोन्ही नेते इच्छुक आहेत. तर चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांनी सुद्धा उमेदवारीवर दावा केला होता. पण त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली. दोन्ही नेत्यांमधील वाद काही दिवसांपूर्वी थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत गेले होते. मात्र आता अंबादास दानवे यांनी एक पाऊल मागे येत पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खैरे दानवे वाद मिटण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून दानवे शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ते म्हणत असतील येणार, मात्र मी जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मी सुस्पष्टपणे सांगत आहे. जे म्हणतात जाणार, याबाबत त्यांनाच विचारणा करा. त्यांना उमेदवार मिळत नसून, हे त्यांचे अपयश आहे. विशेष म्हणजे भाजपची ही हार आहे,असे अंबादास दानवे म्हणाले.

पुढे अंबादास दानवे म्हणाले, मनोज जरांगे यांच्या भूमिकेतून फटका कोणाला बसतो हे त्याच परिस्थितीवर अवलंबून असते. कोणता उमेदवार उभा असतो त्यावर ते अवलंबून असते. टलजींनी सभा घेतली होती. धनगडच धनगर केले जाईल अशी भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली होती. त्यावेळी अटलजींनी दिलेलं व फडणवीसांनी दिलेला आश्वासन पूर्ण झालेले नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.

हे ही वाचा:

जे बाळासाहेबांचं नाव ‘वापरून’ त्यांचा फायदा घेतात, ते…Kiran Mane पुन्हा एकदा चर्चेत

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss