Wednesday, May 8, 2024

Latest Posts

शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या, छगन भुजबळांची मागणी

नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी आमची मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली. माझं नाव तर तुम्हीच चर्चेत आणले आहे.
नाशिकच्या जागेवर अजून चर्चा सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. नाशिकच्या जागेवरुन अनेकजण मुंबईला जाऊन आले आहेत. तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. चर्चेनंतर कुणीही उमेदवार ठरले तर आम्ही काम करणार. भुजबळ कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असे मी सांगितले नाही. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी मागणी केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

साताऱ्याऐवजी नाशिकची जागा देण्याबाबत चर्चा सुरु आहे, मात्र महायुतीमधील नेते याबाबतचा निर्णय घेतील. असे सांगत भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे, त्याबाबत असलेल्या एका कामासाठी गेलो असल्याचे सांगितले. शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही मी पण तुमच्यातला होतो, असे मत छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांबाबत विचारले असता सांगितले. उमेदवारीच्या प्रश्नावर छगन भुजबळ भुजबळ म्हणाले की, जर तरच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. आपल्या पक्षाला जागा मिळावी यासाठी प्रयत्न असतो. नाशिकची जागा आमच्याकडे आली तर चर्चा होईल आणि नंतर उमेदवार ठरेल, असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुद्द्यावर छगन भुजबळ म्हणाले की, मनसे आल्यामुळे आमच्यात पेच प्रसंग निर्माण झाले नाहीत. महादेव जानकर यांच्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  म्हणाले, महादेव जानकर महायुती कडून उमेदवारी करणार आहेत.

हे ही वाचा:

सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत आहे पण आज…CM Eknath Shinde यांचं म्हणणं काय?

आंबेडकरांनी आमच्यासोबत असावं कारण…काय म्हणाले Sanjay Raut?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss