Saturday, July 27, 2024

Latest Posts

वाशीमध्ये जल्लोष का केला गुलाल का उधळला? छगन भुजबळांनी जरांगेंना विचारला प्रश्न

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. सरकारने दिलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीमध्ये न झाल्याने जरांगे पुन्हा उपोषणासाठी बसले आहेत. त्यावर छगन भुजबळांनी सवाल विचारला आहे. २७ जानेवारीला गुलाल उधळला. रात्री डिजे लावला मग आता उपोषण का करताय? असा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे लाखो मराठा बांधवाना घेऊन मुंबईच्या वेशीवर आले होते. त्यानंतर त्यांना सरकारकडून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर मराठा समाज आणि मनोज जरांगे यांनी जल्लोष केला होता. मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, अनेक प्रकारे ओबीसीमध्ये घुसतात सर्व मार्गांनी आरक्षण हवे. ओबीसींचे आरक्षण वाचवणे हे माझं लक्ष आहे. सध्या ओबीसी नोंदींचे फॉर्म गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मनोज जरांगेंना श्रेय घ्याचे आहे. आरक्षण टिकावे याला आमचा पाठिंबा आहे. श्रेय मिळावं म्हणून उपोषण १५ तारखेची वाट बघावी लागणार आहे. जरांगेंनी आम्हाला आईवरुन शिव्या दिल्यात. मात्र, एका अधिवेशनात सर्व विषय मार्गी लागतील, असे छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाचे श्रेय घ्याचे आहे. त्यामुळे ते आता उपोषणाला बसले आहेत. काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र आरक्षण दिले जाईल, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. मग पुन्हा उपोषणाला बसायचे असेल तर वाशीमध्ये जल्लोष का केला? गुलाल का उधळला? असा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला आहे.

हरकती आणि सूचना नोंदवण्यास येणाऱ्या लोकांना मंत्रालयात अनेक अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. व्यवस्था सुरळीत होईल अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे भुजबळ म्हणाले. राजकारणात डाव प्रती डाव असतातच. प्रफुल पटेल यांच्यावरती अपात्रतेची याचिका आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. ती जागाही आमचीच आहे. त्या जागेवर जेव्हा निवडणूक होईल तिथे आम्ही आमचा उमेदवार देऊ,असे छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवर खासदार संजय राऊत यांनी केला गौप्यस्फोट

कुशल बद्रिके गाजवणार हिंदी विनोदी शो,प्रोमो झाला आउट श्रेया बुगडेच्या नावाची वर्णी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss