Saturday, July 27, 2024

Latest Posts

प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवर खासदार संजय राऊत यांनी केला गौप्यस्फोट

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उमेदवार यादी काल जाहीर करण्यात आली.

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उमेदवार यादी काल जाहीर करण्यात आली. महायुतीचे घटकपक्ष भाजपने तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) अश्या पाच पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. या उमेदवारांमध्ये महायुतीमधील भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ आणि डॉ.अजित गोपचडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी ( अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची तीन वर्ष बाकी आहेत. हे असून सुद्धा प्रफुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चाना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटातून त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली, असे म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे.

प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले या देशांमध्ये आधी असं घडलं नव्हतं.पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घेतली. अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाने चंद्रकांत हांडोरे यांना क्रॉस वोटिंग केलं. एक दलित चेहऱ्याला मतदान करून त्यांना राज्यसभेवर पाठवणं अत्यंत महत्त्वाचं होतं त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप हा फुगलेला बेडूक आहे, तो कधीच बैल होणार नाही, अशा टीका संजय राऊत यांनी केली आहे. जे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत त्यांना तुम्ही वेडे समजता का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. या देशामध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी दिल्लीच्या दिशेने लाखोच्या संख्येने कूच करत आहेत. हमीभावासाठी शेतकरी देशाच्या राजधानीकडे येत आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचे फवारे मारले जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत. वाहने जाऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत करत आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ही एक प्रकारची झुंडशाही आहे स्वामीनाथनला तुम्ही भारतरत्न देता स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी मागणी केली होती हेच मोदी २०१४ पासून सांगत आहेत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट केलं जाईल पण शेतकरी आंदोलन करतो आहे त्यांना तुम्ही रोखत आहात. लवकरच उद्धव साहेब एक पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. दिल्लीतली शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या भूमिकेच्या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करतो, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली; विनायक राऊतांनी केली भाजपवर टीका

नामदेव ढसाळ यांचा झंझावात यांचा बायोपिक झळकणार मोठ्या पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss