मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटी मध्ये निर्णयक बैठक बोलावली होती. त्यावेळी मराठा बांधवाना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. जरांगेंची समजूत काढण्यासाठी अनेक मराठा बांधव त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.सध्या आंतरवली सराटीमध्ये उपोषण स्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्यासाठी जात आहेत.
मनोज जरांगे हे आंतरवली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ते आंदोलन स्थळावरून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मनोज जरांगे यांना मुंबईच्या दिशेने निघाल्यावरती अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी उपोषणस्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे. मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाते. गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या विरोधात अनेक पत्रकार परिषद घेण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले होते. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. फडणवीसांचे हे षडयंत्र असून आपली बदनामी करण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
लग्नामध्ये लेहेंगा घालायचा नाही? तर ‘हे’ आऊट फिट नक्की करा ट्राय
Follow Us