Thursday, May 9, 2024

Latest Posts

घटस्फोटाच्या मुद्द्यावर अंकिता लोखंडेने सोडले मौन

बिग बॉसचा सतरावा सिझन २८ जानेवारीला संपला.

बिग बॉसचा सतरावा सिझन २८ जानेवारीला संपला. या सतराव्या सीझनचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा आहे. त्याने आपल्या नावावर बिग बॉस ची ट्रॉफी आणि ५० लाख रुपये केले आहेत. तसेच या शोची अंकिता थर्ड रनर अप झाली आहे. बॉग बॉसचा सतरावा सिझन संपला पण त्यात होणारी भांडण सगळ्यांच्या लक्षात आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघंही या शोमध्ये होते. पण हा शो संपल्यानंतर विकी जैन आणि अंकिता लोखंडे एकमेकांना घटस्फोट देणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात सतत भांडण होत होती.अनेकदा त्यांनी घस्फोट देण्याचा उल्लेख केला होता. मात्र आता हा शो संपल्यानंतर अंकिता लोखंडे हिने घटस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता लोखंडे म्हणाली, काही वर्षांच्या मैत्रीनंतर आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आम्ही बिग बॉसच्या घरात फक्त घटस्फोटाबद्दल बोलायचो पण चाहत्यांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली. मी समजूतदार नाही, जेव्हा मी कॅमेरासमोर असते, तेव्हा मला अधिक समजुतदार होण्याची गरज असते. मी जे काही बोलते, त्याविषयी मला संवेदनशील असायला हवं. या सर्वांमधून मी शिकत जातेय. जर आमचं नातं मजबूत नसतं, तर आम्ही कदाचित भांडलोही नसतो. फरक फक्त एवढाच की आमची भांडणं नॅशनल टीव्हीवर झाली. हे सर्वसामान्य जोडप्यांसोबत कधी घडत नाही. पण या सर्व प्रवासात आमचं नातं आणखी मजबूत झालं आहे. मी कुठे चुकतेय हे मला कळत गेलं आणि विकीलाही त्याच्या चुकांची जाणीव झाली. आता आमचं नातं पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालं आहे, असे अंकिता लोखंडे म्हणाली.

दरम्यान, बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, मला असं वाटत कि बिग बॉसच्या धक्क्यातून मला सावरलं पाहिजे, कारण या शो मुळे माझ्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीच ओव्हरथिंकर नव्हते. पण तिथे परिस्थिती अशी होती की मी तशी बनले. मला त्यातून बाहेर पडायचं आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडलं, त्या सर्व गोष्टींना मी समजण्याचा प्रयत्न करतेय. यात वेळ लागेल, पण नक्कीच मी त्यातून बाहेर येईन, असे अंकिता लोखंडे म्हणाली.

हे ही वाचा: 

‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

बाप बदलण्याची नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे;रोहिणी खडसेंची अजित पवारांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss