उल्हासनगरमध्ये शुक्रवार रात्री (UlhasNagar Crime) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला.या गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक विरोधी नेत्यांनी सरकारांवर टीका केली आहे. महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल, तर महाराष्ट्रची जनता तुम्हाला माफ करणार नाही, तर, पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही, असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देवंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, सर्व गुंडाराज सुरु आहे. महाराष्ट्राचा बिहार करायचा एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत असून, दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहे. या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांना अटक देखील केली जात नाही. हे पहिल्यांदाच असे घडत नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. आधीपण गोळीबारासारख्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रमध्ये असे कधीच झाले नाही जे आज घडले आहे. या सर्व गोष्टींचा निषेध आहे. दुःख याचे आहे की, यांनी जी खिचडी महाराष्ट्रमध्ये चालवली आहे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी अनबन सुरू आहे, त्याचा हे कारण आहे. गृहमंत्री तसे पटकन येतात प्रतिक्रिया देण्यासाठी, पण आज ते दिसत नाही. अशा गोष्टी सहन कशा केल्या जातात. महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबाराचे पडसाद सगळीकडे उमटले आहे. या गोळीबार प्रकरणी शिवसैनिकांचा विरोध वाढत आहे. त्यामुळे आता उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्टेशनबाहेर आणि उल्हासनगर शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आमदार गणपत चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक उल्हासनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पूनम पांडेच्या निधनाची बातमी खोटी,व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
बेकायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं सरकार सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी – Nana Patole