Saturday, July 27, 2024

Latest Posts

Aaditya Thackeray PC Live, सरकारवर टीका करत म्हणाले, किती रस्ते झाले ते दाखवा?

माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर देखील चांगलाच हल्लबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत असल्याचे चित्र दिसत आहेत. एकीकडे नुकतंच राज्याचे हिवाळी अधिवेशन हे संपले आहे. तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबाची (Thackeray Family) जवळीक काहीशी वाढताना दिसत आहे. याच कारण म्हणजे काही दिवसांपासून माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची बाजू घेतली होती. तर आज दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमानिम्मित ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले आहेत. आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला. तर या सर्व घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला आहे.

शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली या संदर्भात आज आदित्य ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न केला असता ते म्हणाले आहेत कि, “मला वाटतं आम्ही त्यावर बोललो आहोत. आता परत त्यावर बोलण्यापेक्षा, मुंबईतील प्रश्न महत्वाचे आहेत”. तर नंतर आजच्या ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत आदित्य ठाकरे याना विचारले असता त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ” ते फक्त लग्नात शुभेच्छा देण्यासाठी गेले होते”.

तसेच पुढे माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर देखील चांगलाच हल्लबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे आणि म्हणाले आहेत की, किती रस्ते झाले ते दाखवा? ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करताय. एमटीएचएलचे ८३ टक्के काम आमच्या सरकारमध्ये पूर्ण झालं आहे. आता उद्घाटनला एवढा वेळ लागत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हे काम अजून तयार नाही? दीड महिना स्वतःच्या स्वार्थासाठी पेंडिंग ठेवलं आहे. तर दुरीकडे नवी मुंबई मेट्रोचा काम सुद्धा ५ महिने ठेवले आहे. दिघी स्टेशन ८ महिने झालं तयार आहे. पण व्हीआयपीची उद्घाटनाला वेळ मिळत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना स्वतःच्या जिल्ह्यात उदघाटन करता येत नाही, तुम्ही राज्याचा काय करणार ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

हे ही वाचा:

Christmas Cake : ख्रिसमस केकचे हे ७ प्रकार तुम्हाला माहितीयेत का ?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

पुण्यात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss