Wednesday, April 24, 2024

Latest Posts

आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली माहिती

राज्यात मागील काही दिवसांपासून पेपर फुटीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पेपर फुटीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तलाठी भरतीच्या वेळी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला जात आहे,अशी टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती. त्यावर रोहित पवार यांच्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुन्हा दाखल केला आहे. राधाकृष्ण विखेपाटील यांनी पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे विखे पाटील म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तुम्ही एखादं वक्तव्य करता, तर त्याचे जाहीरपणे पुरावे मांडा. तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवांना ती परंपरा पुढे घेऊन जाण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत कारवाई करणार आहोत. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना समाजाने आदराचे स्थान दिले आहे. मी म्हणजे मराठा समाज हे मनोज जरांगे यांनी डोक्यातून काढले पाहिजे. त्यांनी आता मराठा समाजाच्या भावनांशी खेळणं बंद केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना केलेले विधान कोणत्याही शीष्टाचारला धरून नाही. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. जिआर काढले आहेत. ते तुम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे तुम्ही म्हणजे समाज नाही. आंदोलनासाठी समाजाने पाठबळ दिले, मात्र तुम्हाला स्वतःच हित सध्या करायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुतारी वाजवता की हातात मशाल घेता. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी मला राजकारणात येऊ दिल नाही म्हणून अजित पवारांचा मार्ग सुखकर झाला, असे विधान राजेंद्र पवारांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. यांवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मी त्यांनी केलेले विधान ऐकले नाही. मात्र रोहित पवार यांना तो सूचक इशारा असला पाहिजे. फार धावपळ करून जशी अजित पवार यांची फसवणूक केली तशी तुझी देखील फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांनी केलेल्या विधानातून मला सूचित करावे वाटते, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

नाशिकमधील आदिवासी शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

राज्यस्तरीय मेळाव्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी होणार नमो महारोजगार मेळावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss