Tuesday, April 23, 2024

Latest Posts

नाशिकमधील आदिवासी शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

नाशिक (Nashik) मधील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

नाशिक (Nashik) मधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज माकप आणि किसान यांच्यामध्ये झालेली सभा निष्फळ ठरली आहे. ही सभा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिकच्या मुख्य चौकात चक्काजाम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकरी गाड्या आवडवून आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांच्यासारखे तीव्र आंदोलन नाशिकमध्ये केले जाणार आहे, असे आंदोलक म्हणाले आहेत. मोर्च्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभा आणि माकपचे लाल वादळ अधिक तीव्रपणे धडकले आहे. अनेक वर्षांपासून मागण्या केल्या जात आहेत. मागील वर्षी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहचल्यानंतर शहापूरमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मागे पळवले होते. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. किसान सभेच्या वेळी शेतकरी आक्रमक झाले होते. सीबीएस चौकात चक्काकजाम केल्याचे चित्र दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन तीव्र स्वरूपाचे असल्याने पोलीस बळ कमी पडत आहे. आंदोलन करत असलेल्या आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने बसमधील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक प्रवाशांना बस मधून खाली उतरवले जात आहे. सीबीएस चौकात जाणाऱ्या सर्व मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना होत आहे. या शिष्टमंडळात ११ जणांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आज विधिमंडळात सरकारसोबत बैठक झाली होती मात्र ही बैठक असफल ठरली. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरूकेले आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांबद्दल बोलल्यानंतर एसआयटी चौकशी केली जाते; आमदार रोहित पवारांची टीका

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss