Tuesday, May 21, 2024

Latest Posts

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

वेदांता सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेला याबाबत अद्याप सरकारकडून कुठलाच अधिकृत खुलासा आलेला नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वेदांता सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेला याबाबत अद्याप सरकारकडून कुठलाच अधिकृत खुलासा आलेला नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून आता राजकारण तापले आहे. आता त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे – फडणवीस सरकारवर नवा आरोप केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर नवा आरोप केलाय. रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही( Bulk drug park project) महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. दावोसमधून तीन दिवसांत ८० हजार कोटी आणल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हंटले आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला याची माहिती आपल्या सर्वांना कळाली. पण अजूनही यावर या सरकारकडून कुठलाच खुलासा आलेला नाही. १ लाख रोजगार उपलब्ध करुन देणारा प्रोजेक्ट असा दुसऱ्या राज्यात का गेला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रात यायला तयार होता. यावर कुठलाही खुलासा न होता आरोप-प्रत्योरोप सुरु झाले आहेत. यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू असंही सांगितलं जात आहे. यावर ठळकपणे उत्तर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण व्हाट्सअँप वरुन याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे, असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने ४० आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडं नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत नका पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही? तसेच ते पुढे म्हणाले फॉक्सकॉनबाबत व्हाट्सअँपवर खोटे मेसेज पसरवले जात आहे. ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त होते. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हा विषय माहिती नाही. किमान उद्योगमंत्र्यांनी उत्तरे दिली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

२०२५-१६ मधील मॅग्नेटिक महाराष्ट्राचा एमओयू होता फॉक्सकॉनचा त्यानंतर फॉक्सकॉन आणि वेदांतासोबतचा वेगळा एमओयू या दोघांची सांगड घालून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम व्हाट्सअँप वर सुरु आहे. २०१५ मधला करार हा आयफोनच्या असेम्ब्लीसाठीचा होता, याचं पुढे काय झालं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. तसेच आत्ताचा जो करार होता तो सेमिकंडक्टर्स चीप्सबाबतचा होता. यासाठी केंद्रानं ७६ हजार कोटींची सबसिडी मंजूर केली होती. त्याचअनुषंगानं आम्ही २१ जानेवारी २०२२ रोजी अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करुन त्याचा पाठपुरावा केला, असंही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

 

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याचा अद्याप सरकारकडून खुलासा नाही, आदित्य ठाकरेंचा आरोप

फॉक्सकॉनवर माजी उद्योगमंत्री देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले “गुजरातची कुठेच चर्चा नव्हती”

मस्कत-कोची एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग; प्रवाशांना तातडीने काढले बाहेर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss