Tuesday, April 16, 2024

Latest Posts

देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आडवाणी यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी – CM Eknath Shinde

लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न (Bharat Ratna to LK Advani) जाहीर करण्यात आला आहे. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विट करत या संदर्भात बातमी दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर यांच्या १०० व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर आता आडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व

“प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते आडवाणी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असे अभिष्टचिंतन करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते आडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून लालकृष्ण आडवाणी यांचं कार्य महत्त्वपूर्ण

उत्कृष्ट संसदपटू, समाजकारणातील समर्पित नेतृत्व असणारे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून लालकृष्ण आडवाणी यांचं कार्य महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत बेधडक आणि ठामपणे आपली मते मांडली. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss